मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. या संदर्भात मुंबई महापालिका आयुक्त, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, जिल्हाधिकारी, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट यांसह संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. महापालिकेकडे आतापर्यंत ८ हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. बैठकीत तीन दिवसांत, गणपतीपूर्वी सर्व खड्डे पूर्णपणे भरण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले, अशी प्रतिक्रिया आज शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली.