भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथील सहवनक्षेत्र जांभळी अंतर्गत येणारे मौजा जांभळी सडक येथील सोमा बुधाजी पाथरीकर (६२) यांच्या मालकीचा बैल चराईसाठी गेला असता पट्टेदार वाघाने बैलाला ठार केल्याची घटना जंगल परिसरात घडली. यात पशुपालकाचे अंदाजे ५५ हजार रुपयाचे नुकसान झाले. जांभळी येथील पशुपालक सोमा पाथरीकर यांनी आपल्या मालकीचे पशुधन वनविभागाच्या कक्ष क्रमांक- १८५ मधील जंगलात सकाळी चराईसाठी नेले असताना दबा मारून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्यांच्या बैलाचा पाठलाग करून प्राणघातक हल्ला करून ठार केले.