माळशिरस तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. दरम्यान, नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमध्ये माळशिरस तालुक्यातील जनतेला आधार देण्यासाठी मी बिहारवरून निघालोय, अशी माहिती माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी आज शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजता सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.