पो.स्टे.रामटेक अंतर्गत येणाऱ्या नागपूर- जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कांद्री वस्ती येथे नागपूर कडून शिवनीकडे जाणारी एक दुचाकी अनियंत्रित होऊन महामार्ग दुभाजकाला धडकली. यात महामार्गावर पडून दुचाकी वरील दोघे युवक जखमी झाल्याची घटना शनिवार दि. 6 सप्टेंबरला रात्री 11:55 च्या दरम्यान घडली. टोल प्लाजाच्या वैद्यकीय चमुने दोघांनाही उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे आणले. नंतर दोघांनाही पुढील उपचारासाठी मेयो हॉस्पिटल नागपूर येथे रेफर करण्यात आले. जखमी दोन्ही युवक शिवनी म. प्र. येथील रहिवासी होते.