धुळे पत्रकार भवनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष रणजीत राजे भोसले यांनी धुळे ‘अवैध धंद्यांची राजधानी’ झाल्याचा आरोप केला. शहरात तब्बल ३६७ ठिकाणी सट्टा, मटका, अवैध शस्त्र विक्रीसारखे धंदे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या धंद्यांना पोलिस व राजकीय पाठबळ असल्याचा दावा करत त्यांनी प्रशासनाने कारवाई न केल्यास सर्व पुरावे घेऊन थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला.