कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या वतीने आज 11 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 9 यावेळेत ईव्हनिंग रूट मोहीम राबविण्यात आली. शहरातील मुख्य चौक, बाजारपेठ, तसेच टवाळखोरांची वर्दळ असलेल्या ठिकाणी पोलिसांनी पायदळ गस्त घालत कारवाई केली. या मोहिमेचे उद्दिष्ट शहरातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हे होते. मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी व अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते.