जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हास्तरावरील आर. आर. सी. नोडल अधिकारी व पिअर एज्युकेटर यांची ओरिएंटेशन कार्यशाळा बुधवार दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता पार पडली. युवकांना आरोग्यविषयक जनजागृती, एचआयव्ही प्रतिबंध, जीवनशैलीतील बदल तसेच कौशल्यविकास या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नोडल अधिकारी व पिअर एज्युकेटर यांना माहिती दिली.