तालूक्यातील वडेगांव येथील १७ वर्षीय यूवती चैताली प्रल्हाद बोरकर हिने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटणा आज दि.१२ सप्टेबंर शूक्रवार रोजी दूपारी १२ वाजेचा सूमारास घडली.चैताली कूरखेडा येथील विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालयात वर्ग ११ वी सायन्स ची विद्यार्थीनी होती आज दूपारी घराला लागूनच असलेल्या जून्या घरात तिने दोरीचा साहायाने आळ्याला गळफास लावत आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच कूटूंबिय व गावकर्यांनी घटणास्थळी धाव घेत तिला आळ्यावरून खाली उतरवत उपजिल्हा रूग्णालय कूरखेडा येथे आणले.