ग्रामीण भागात असलेल्या आकोली शेतशिवारात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा विषारी सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.रामचंद्र महादेव भानारकर वय 60 वर्ष राहणार आकोली असे मृतकाचे नाव आहे. याबाबत चे वृत्त असे की मृतक भानारकर हे आकोली शेतशिवारात बकऱ्या चरण्यासाठी गेले होते. अशातच त्यांच्या पायाला विषारी सापाने चावा घेतला.ते बेशुद्ध झाले. त्यावरुन ग्रामीण रुग्णालय कूही येथे भरती केले असता येथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.