वर्धा-नांदेड रेल्वे मार्गासाठी दारव्हा रेल्वे स्टेशन परिसरात खोदण्यात आलेल्या खोल खड्ड्यांमुळे झालेल्या चार चिमुकल्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करून मृतांच्या कुटुंबियांना भरपाई द्यावी, अशी मागणी मनसेने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे गुरुवारला निवेदनाद्वारे केली.