गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात चाकूहल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेशी गैरवर्तन करून विनयभंग करणाऱ्या दोघा संशयित तरुणांना जाब विचारल्याने पीडित महिलेच्च कुटुंबावर चाकू हल्ला करण्यात आला. या घटनेत पीडितेचा पती गंभीर जखमी झाला असून, तिचा मामे भाऊ आणि स्वतः महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. शहरातील गजबजलेल्या भागात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.