छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दिनांक १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक २ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत सेवा पंधरवाडा महसूल विभागामार्फत साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने तहसिल कार्यालय सडक अर्जुनी येथे उपविभागीय अधिकारी वरून कुमार शहारे अर्जुनी मोरगांव यांचे अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली.