हिंगोली महाराष्ट्र सरकारने ओबीसीचे शिक्षण नोकरी राजकारणातील 27% आरक्षण संपवण्यासाठी हैदराबाद गॅझेटचा जीआर लागू केला त्यामुळे 65 टक्के ओबीसींना आता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ आली आहे हैदराबाद गॅझेट जीआर आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करावी या मागणीसाठी ओबीसी संघर्ष होता प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी 17 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा निघणार आहे.