आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा या गावात आज दुपारी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सावळी सदोबा येथील नाल्याला पूर आल्याने बाजारपेठेसह नाल्या काठावरील घरात पुराचे पाणी शिरले आहे. अनेक दुकानात पाणी शिरल्याने अनेक व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सावळीसदोबा या ग्रामीण परिसरातील मोठ्या प्रमाणात नदी-नाले असल्याने,आणि आज झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील सर्वच नाल्याला पूर आला सर्व नाले तुडुंब भरल्याने अनेक मार्ग बंद झाले होते,सावळी सदोबा ते पुरुषोत्तम नगर,सावळी सदोबा ते चिंचब