ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या निवडणुकीला आव्हान देणारे माजी खासदार राजन विचारे यांनी केलेली निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे म्हस्के यांची खासदारकी कायम राहणार आहे. विचारे यांच्या याचिकेवर प्रदीर्घ सुनावणी घेतल्यानंतर एकलपीठाने निर्णय राखून ठेवला होता. न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या एकलपीठाने मंगळवारी या याचिकेवर निर्णय देताना विचारे यांनी म्हस्के यांच्यावर केलेले आरोप मान्य करण्यास नकार दिला. तसेच, विचारे यांची याचिका फेटाळली.