छत्रपती संभाजीनगर: नंदनवन कॉलनी या उच्चभ्रू सोसायटीतील आपारमेंटच्या फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा छावणी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका पीडित महिलेची सुटका करून आंटीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिनाज उस्मान बेग वय ४५ असे अटक करण्यात आलेल्या आंटीचं नाव आहे.