घाटंजी तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य आक्रोश मोर्चा काढला.बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश हा ऐतिहासिक व घटनात्मकदृष्ट्या अन्यायकारक आहे. त्यामुळे बंजारा समाज बांधवांचा अनुसूचित जमातीत समावेश केल्यास राज्यभर उग्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा देण्यात आला.यावेळी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांची उपस्थिती होती.