बुधवारी सकाळी ११ वाजता सातारा जिल्हा कारागृहासमोर पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांनी ८१ वर्षापूर्वी सातारा जेलच्या तटावरुन मारलेल्या उडीचा शौर्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी हुतात्मा शिक्षणउद्योग समुहाचे चेअरमन वैभव नायकवडी यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, कारागृह प्रमुख रमाकांत शेडगे, वीरधवल नायकवडी, चैतन्य दळवी, अस्लम तडसर आदी उपस्थित होते.