राधा कृष्ण गणेश मंडळ, मुंडीपार यांच्या वतीने आज एक प्रेरणादायी समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून मा. सुश्मिताताई भिमटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. समाजातील सध्याच्या समस्यांवर प्रकाश टाकत त्यांनी महिलांचे सशक्तीकरण, शिक्षणाचे महत्त्व, व्यसन मुक्ती , स्वच्छता, तसेच सामाजिक ऐक्य आणि युवा वर्गाची जबाबदारी यावर प्रभावी भाष्य केले.