आज दि २२ ऑगस्ट रोजी सांयकाळी ६:३० वाजता माध्यमांना माहिती मिळाली कि कन्नड तालुक्यातील हतनूर येथे बैल पोळा सणादरम्यान बैल अचानक उधळल्याने गोंधळ उडाला. या घटनेत बैलासह दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत. सदरील व्हिडिओ सोशल मिडियावर देखील व्हायरल होत आहे.