नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी गावाजवळ २८ जुलै रोजी सायंकाळी नदीपात्रात ६० वर्षीय वृद्ध महिलेचा हात कापलेला मृतदेह आढळून आला होता. शवविच्छादनानंतर महिलेच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या. याप्रकरणी २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी मोलगी पोलिसात अज्ञाताविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.