या शैक्षणिक वर्षापासून इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह प्रवेश व वसतीगृहापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी वसतिगृहाकरीता ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.