यवतमाळ शहरातील दारव्हा मार्गावरील चिंतामणी खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ६ ते १४ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रसंत मोरारीबापू यांच्या रामकथा पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री ७:३० आणि रविवार, ७ ते रविवार, १४ सप्टेंबर या कालावधीत दररोज सकाळी ९:३० ते दुपारी १:३० या वेळेत हा रामकथा सोहळा पार पडणार आहे, याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.