वर्धा शहरात आज 28 सप्टेंबर रोजी सकाळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेद्वारे आयोजित करण्यात आलेल्या 'श्री दुर्गामाता दौड'ने वर्धेतील रस्त्यांवर देशभक्ती आणि धर्मनिष्ठेचे स्फुरण जागवले. शिवाजी महाराज चौकापासून सुरू झालेली ही दौड शहराच्या प्रमुख मार्गांनी पुन्हा शिवाजी महाराज चौकात विसर्जित झाली. खऱ्या अर्थाने, ही दौड म्हणजे केवळ एक शारीरिक कसरत नसून, ध्येयनिष्ठेचा एक जागर असल्याचे सायंकाळी पाच वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे