जळगाव तालुक्यातील मन्यारखेडे शिवारातील इस्कॉनच्या हरेकृष्ण मंदिरात रविवारी ३१ ऑगस्ट सकाळी ११ वाजता श्रीमती राधाराणी यांच्या पावन प्राकट्यदिनानिमित्त 'श्री राधाष्टमी महोत्सव' अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. या विशेष सोहळ्यामध्ये परिसरातील आणि जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली, ज्यामुळे मंदिरातील वातावरण चैतन्यमय झाले होते.