श्री गणेश चतुर्थीनिमित्त फलटण शहर व तालुक्यातील घरगुती गणेशाचे शनिवार दि. 7 सप्टेंबरला सकाळपासून सायंकाळपर्यंत तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील श्री गणेशाची गणेश भक्तांनी भक्तीमय वातावरणात व जल्लोषात गणरायाची प्रतिष्ठापना केली. शनिवार दि. 7 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता शहरातील बाजारपेठेत माहिती घेतली असता नगरपरिषद चौक, शिंपी गल्लीतील रस्तावर नागरीक, महिलांनी व वाहनांनी गर्दी केली होती. यावर्षी आवश्यक पाउस झाला असल्याने तालुक्यात, जिल्ह्यात व राज्यात समाधानाचे वातावरण आहे.