जिल्हा परिषद च्या शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया ऑनलाइन पोर्टल द्वारे करण्यात आली. मे महिन्यामध्ये पूर्ण होणारी प्रक्रिया यावेळी सप्टेंबर महिना उजाडूनही निकाली निघाली नाही.सहा टक्के पूर्ण झाले आहेत.दोन हजाराच्या घरामध्ये शिक्षकांची बदली होऊन आदेश जाहीर झाले.परंतु कार्यमुक्ती आदेशाकरिता शिक्षकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.