वसई पूर्वेकडील नवजीवन नाका परिसरात दुचाकी आणि डंपरचा वभीषण अपघात घडला. डंपर आणि दुचाकी समोर धडकले आणि दुचाकीस्वार दुचाकीसह डंपर खाली अडकला. स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवत दुचाकीस्वाराला दुचाकीसह डंपर खालून बाहेर काढले. दुचाकीस्वार जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही, अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला आहे.