संगमेश्वर तालुक्यातील गाव रहाट येथील बंधाऱ्यावर दारू सेवन करताना तोल जाऊन पडल्याने प्रमोद प्रभाकर मेढेकर (वय 47, रा. नवी मुंबई) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मेढेकर हे त्यांचे नातेवाईक व मित्र दीपक मुकुंद खडपेकर (रा. सीवूड, नवी मुंबई) यांच्यासह 4 सप्टेंबर रोजी सकाळी सावंतवाडी-दिवा पॅसेंजर गाडीने संगमेश्वर येथे आले होते. तेथून रिक्षाने दोघेही संगमेश्वर एसटी स्टँडवर आले. त्यानंतर त्यांनी गावातील मित्र मंगेश रामचंद्र जाधव (कुरधुंडा बौद्धवाडी) याला भेटण्यासाठी निघाल्याचे सांगितले.