पत्रकार म्हणून एका हॉटेल चालकाला दर महिन्याला पाच हजार रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संतोष राजेंद्र दुधभाते रा. (वडगाव लाख ता. तुळजापूर जि धाराशिव) यांनी वडगाव लाख शिवारातील हॉटेल शंभु येथे फिर्यादी खंडु उमराव लोहार यांना आरोपीने मी पत्रकार आहे, मला दर महिन्याला पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, याप्रकरणी दूधभाते यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती तुळजापूर पोलिसांनी १० सप्टेंबर रोजी तीन वाजता दिली.