वाशिम शहरा बाहेर रस्ता ओलांडताना महाराजा ट्रॅव्हल्सने 16 वर्षीय मुलीला सायकल सह उडवल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. संध्या सारसकर असं अपघातात ठार झालेल्या मुलीचं नाव आहे.. संध्या ही आपल्या सायकलने रस्ता पार करत असताना पुसद कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ने समोरून आडव्या आलेल्या संध्याला सायकलसह उडवले यात ती जागीच ठार झाली.