मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खाजगी बस आणि ट्रकची धडक झाल्याने भीषण अपघात घडला आहे. गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खाजगी बसने मागून ट्रकला जोरदार धडक दिली, विवळवेढे उड्डाणपूलावर हा अपघात घडला आहे. या अपघातात आठ प्रवासी जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही.