जिंतुर शहरातील बसस्थानकाच्या मागे स्वच्छतागृहाच्या बाजूला दिवसाढवळ्या दोन अज्ञात चोरट्यांनी मजुराला चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. यावेळी त्यांनी मोबाईल व रोकड रक्कम असा सुमारे ११ हजार १७० रुपयांचा ऐवज लुटला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी दिनांक 29 रोजी दुपारी घडली.दिनांक 30 रोजी दुपारी तीन वाजताजिंतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.