पडवे- माजगाव धनगरवाडी येथील एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रात्री घडली. लक्ष्मीकांत शिंत्री (वय ३३)असे मृताचे नाव आहे.त्याने बेरोजगारीला कंटाळून हा प्रकार केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती बांदा पोलीस ठाण्यातून गुरुवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता देण्यात आली.