तालुक्यातील कोडीद परिसरातील तेल्यामहु गावात अज्ञातांनी एका 26 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. नानसिंह सोहज्या पावरा वय 26 रा. तेल्यामहू, पो. कोडीद ता. शिरपूर असे मयत तरुणाचे नाव आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी लक्ष्मण सोहज्या पावरा वय 29 यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास तालुका पोलीस करीत आहे.