देऊळगाव मही येथे अज्ञात वाहनाचे धडकेत 55 वर्षीय महिलेचा मृत्यू बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथे एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना १ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी दिग्रस रस्त्यावर घडली.विठाबाई पुंडलिक बनसोडे (वय ५५, रा. देऊळगाव मही) या शेतात कामासाठी निघाल्या होत्या. सकाळच्या सुमारास त्या रस्त्याने चालत असताना मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात विठाबाईंच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.