सहा सप्टेंबर रोजी अकोला येथील गुलजारपुरा भागात घडलेल्या संतापजनक घटनेचा राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाच्या वतीने मेहकर तहसील दार यांना निवेदन देण्यात आले. तेरा वर्षाच्या भोई समाजाच्या अल्पवयीन बालिकेवर तोहितसमर या गुन्हेगारीत प्रवृत्तीच्या व्यक्तीने बालिकेवर पाचव्यांदा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटनेच्या वेळी बालिकेच्या घरातील व्यक्ती हे गणेश विसर्जनासाठी गेले होते. याची संधी साधून आरोपीने अमानुष कृत्य केले.