बंजारा समाजाची ‘काशी’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध पोहरादेवी तसेच उमरी येथील विकासकामांची पाहणी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज (दि.९ सप्टेंबर) केली. यावेळी त्यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा घेऊन पर्यटनदृष्ट्या आकर्षक व नागरिकांसाठी सुविधायुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या.