जालना जिल्ह्याच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी गुरुवार दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या सुमारास गेवराई बाजार आणि गोकुळवाडी गावाच्या परिसरात थेट बांधावर जावून शेतपिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकर्यांशी संवाद साधून त्यांनी शेतकर्यांना दिलासा दिला. जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून संततधार पावसामुळे शेतकर्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमिवर पावसाने नुकसान झालेल्या शेतातील पिकांची पाहणी केली.