तहसील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाढवे यांनी 12 सप्टेंबरला दुपारी चार वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, महिलेला भेटायला बोलवून तिचे कारने अपहरण करून तिला बेदम मारहाण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.महिलेचा उपचार शासकीय रुग्णालयात सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक राहुल वाढवे यांनी दिली आहे.