ग्रामपंचायत मुंडीपार येथे पारंपारिक पद्धतीने तान्हापोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तान्हापोळा निमित्ताने लहान बालगोपालांसाठी आकर्षक नंदी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक व कलात्मक पद्धतीने सजावट करणाऱ्या पहिल्या पाच नंद्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रम ग्रामपंचायत मुंडीपार आणि गाव तंटामुक्ती समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.