गडचिरोली शहरालगत एसओएस शाळेकडून शहराकडे वेगाने येणाऱ्या स्कूल व्हॅनने दुचाकीला धडक दिली. यात महिलेसह युवक गंभीर जखमी झाला, गडचिरोलीच्या धानोरा मार्गावर सोमेश्वर नागोसे (42 वर्ष) हे दुचाकीने इंदिरा नगरकडून शहराकडे येत होते. यावेळी एका महिलेने त्यांना लिफ्ट मागितली. याचवेळी स्कूल आॅफ स्कॅालर्सकडून येत असलेल्या एका स्कूल व्हॅनने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.