आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी अंदाजे चार वाजेच्या दरम्यान भद्रुटोला पळसगाव येथे रस्त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पट्टेदार वाघ दिसल्याची माहिती आहे भद्रुटोला पळसगाव येथे एका शेतात दबा धरून बसलेला वाघ अचानक लोकांना दिसताच त्यांची तारांबळ उडाली आणि याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच वाघाला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती शेतात वाघ असल्याची माहिती होताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे