आज बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी समिती गठीत केली असून या समितीमध्ये प्रत्येक पक्षाचे दोन असे ६ सदस्य असतील. संजय गांधी निराधार योजनेमध्ये मिळणाऱ्या दीड हजाराचे अडीच हजार केले. विविध विकास प्रकल्पांना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय कायदेशीर आणि नियमाला धरून आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्यात कुठलीही अडचण येणार नाही.