मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होते. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या असून मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने मंचर ता. आंबेगाव येथील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी व मंचर करांनी एकत्र येत आनंद व्यक्त केला आहे. यावेळी मराठा बांधवांनी एकमेकांना लाडू भरवत, फटाके फोडत आनंद साजरा केला आहे.