उच्च न्यायालयाचे आदेश पारित झाले असताना देखील प्रत्येक सण उत्सवात मोठ्या प्रमाणावर डिजे वाजत आहेत. बालकांपासून वयोवृद्धां पर्यंत सर्वांनाच त्या आवाजाने गंभीर दुष्परिणाम होत आहेत म्हणून डिजेवर कायम स्वरुपी बंदी घालण्यात यावी अशी मागणी राहुरी शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. याबाबत अधिक शुक्रवारी तहसील आवारामध्ये तहसीलदार नामदेव पाटील यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.