संगम माहुली,बुधवार नाका कृत्रिम तळे[सातारा],महागणपती घाट(वाई),कृष्णा घाट (भुईंज),प्रितीसंगम घाट(कराड),पाचवड फाटा(धोंडेवाडी),येरळा नदी(वडुज),येरळा नदी(पुसेगाव),कोयना नदी मुळगाव पुल(पाटण),निसरे पूल मारूलहवेली या दहा ठिकाणी राबविलेल्या पर्यावरणपुरक उपक्रमात १७०१सदस्यांनी १०७२१.४१ किलोग्रॅम निर्माल्य संकलन करून आज रविवारी प्रतिष्ठानमार्फत वृक्षारोपणठिकाणी खतनिर्मितीच्या प्रक्रियेस सुरुवात केली.