सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासारखी रिकामटेकडी माणसे काही जणांना बरोबर घेऊन सावंतवाडीतील जनतेला वेठीस धरतात, हे योग्य नाही. कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, या मताचा मी आहे, असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी मांडले. ते पत्रकारांशी बोलत होते.