जालन्यात बसस्थानक परिसरातील राजमाता लॉजवर पोलिसांचा छापा; कुंटणखाना उध्वस्त, 4 महिलांची सुटका, लाॕजवर वेश्याव्यवसायाबाबत पोलीसांना मिळाली होती गुप्त बातमी आज दिनांक 10 बुधवार रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात बसस्थानक परिसरातील राजमाता लॉजमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून लॉज मॅनेजरसह तिघा पुरुषांना अटक केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी चार महिलांची सुटका केली असून आरोपींकडून रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.