छत्रपती संभाजी नगर येथील वसतीगृहात शिक्षण घेत असलेली आठ वर्षीय मुलगी खंडाळा देवी येथे गावी आली. अठराविश्व दारिद्र असल्याने गोठ्यात राहणाऱ्या या मुलीला २८ ऑगस्टच्या रात्री विषारी सापाने दंश केला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. आरोही पडघान असे त्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे.मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील संतोष पडघान हे पत्नी, दोन मुली व एक मुलासह गावातीलच जानकीराम मानघाले यांच्या गोठ्यावर वास्तव्यास होते.